Homeताज्या बातम्यानाशिक एसीबीची धडक कारवाई येवला वनपरिक्षेत्र कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ८ जण जाळ्यात...

नाशिक एसीबीची धडक कारवाई येवला वनपरिक्षेत्र कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ८ जण जाळ्यात ११,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; वन विभागात खळबळ

निफाड योगेश कर्डिले प्रतिनिधी

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील ६ लोकसेवक आणि २ खाजगी इसम अशा एकूण ८ जणांना ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या दाहेगाव पाटोदा (ता. येवला) येथील गट क्रमांक ६१ मधील २ हेक्टर ४९ आर क्षेत्रातील सागाची झाडे तोडून विक्री करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला (अंगणगाव) येथे अर्ज केला होता. परवानगी मंजूर करून देण्यासाठी संबंधित आरोपींनी सुरुवातीला १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ११ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. दि.१६ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि.१९ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपींनी आपापसांत लाचेच्या रकमेत वाटणी निश्चित करून ती स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
लाचेच्या रकमेत भाऊसाहेब माळी यांच्यासाठी ५ हजार रुपये, पंकज नागपुरे यांच्यासाठी २ हजार रुपये, तर प्रविण भोसले, आकाश कोळी, विजय लोंढे आणि निखील आरणे यांच्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये तसेच सुनिल भुरूक यांच्यासाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले होते. रामनाथ भोरकडे यांनी तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत ५०० रुपयांच्या २३ नोटांसह एकूण ११ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७, ७अ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाऊसाहेब पंढरीनाथ माळी (वनपाल), पंकज राजेंद्र नागपुरे (वनरक्षक), प्रविण बाळासाहेब भोसले (कनिष्ठ लिपीक), आकाश नामदेव कोळी (कार्यालयीन वनरक्षक), विजय शिवाजी लोंढे (अधिसंख्य वनमजूर), रामनाथ लक्ष्मण भोरकडे (अधिसंख्य वनमजूर), निखील सुनिल आरणे (खाजगी डेटा ऑपरेटर) आणि सुनिल भगवान भुरूक (खाजगी चालक) यांचा समावेश आहे.
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक पुनम केदार यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलीस निरीक्षक प्रतिभा आबुज यांनी सह सापळा व तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्यासह युवराज खांडवी, प्रभाकर गवळी, नितीन नेटारे, किरण धुळे आणि गणेश निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६८ किंवा ०२४१-२४२३६७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!