Homeक्राईमब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून, त्यामधून अमानुषपणे कोंबून नेण्यात येणाऱ्या २० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी भूषण जम्पलवार (रा. चंद्रपूर), गणेश गोहणे, अमित कोवे आणि विकास कळसकर (सर्व रा. चिखली, ता. मूल) या चौघांना ताब्यात घेतले आहे. तसेच अकील कुरेशी (चंद्रपूर), रुपेश माहुरे आणि धनराज माहुरे (रा. नवेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पदरीत्या गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गांगलवाडी-एकारा मार्गावर सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान दोन पिकअप वाहने (MH49AT8332 आणि MH27DT1542) अडवून पाहणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत वाईट अवस्थेत कोंबून नेण्यात येत असल्याचे आढळून आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, तसेच पोलीस कर्मचारी अरुण पिसे, रतन लेनगुरे, मिलिंद नैताम, अमोल लोनबले आणि शुभम लेडांगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!