परभणी (अनिल शेटे)
गंगाखेड तालुका व मतदार संघ निश्चित बाळासाहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या विचारावर प्रेम करणारा आहे त्यात काही शंका नाही. आज पर्यंत मी केवळ परभणी विधानसभा पुरता कार्यक्षेत्र असल्याने मर्यादा येत होत्या परंतु आता पक्षाने संपूर्ण परभणी जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे म्हणून यापुढे मी गंगाखेडकरांचा सुख दुःख विकासात्मक कार्यासाठी आणि पक्षाच्या जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे राहणार असे प्रतिपादन परभणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी नागरी सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.
दिनांक 18 मे रोजी शिवसेना नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांचा व्यापारी संघ व विविध सामाजिक संघटना आणि शिवसेना यांच्या वतीने मोरया फंक्शन हॉल येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख रवी धर्मे परभणी महानगरप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेअरमन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव विठ्ठलराव रबडे मामा डॉक्टर सुभाष कदम माझी जि प सभापती श्रीनिवास मुंडे नगरसेवक धम्मानंद घोबाळे ज्येष्ठ तथा माझी उपसभापती पंडितराव मुंडे गुरुजी मनोर महाराज केंद्रे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी सुभाष दादा नळदकर उपजिल्हाप्रमुख महादेव शेंडगे बालाजी लोखंडे साहेबराव कल्याणकर तालुकाप्रमुख जानकीराम पवार बापूराव पोळ छगनराव मोरे तालुका संघटक धोंडीराम जाधव शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे,सायस चिलगर शिवसेनेचे तालुका अधिकारी भागवत शिंदे शहर संघटक अमोल खतिंग प्राध्यापक मुंजाजी चोरघडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती विष्णू मुरकुटे बोलताना म्हणाले की मला शिवसेनेच्या सर्वोच्च जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली याचे कारण मी केलेले सामाजिक कार्य कधीही भक्षभेद न करता प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि कामात उभा गरजूंना मदत या सर्व बाबींचा विचार करून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती चोखपणे पार पाडणार असे वचन मी उद्धव साहेब ठाकरे आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना याप्रसंगी देत आहे. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, रवी धर्मे , डॉक्टर विवेक नावंद, डॉक्टर सुभाष कदम ,मनोहर महाराज केंद्रे, गोविंद यादव आदीने मनोगत केले. विष्णू मुरकुटे यांच्या कार्याचा बद्दल गौरव उदगार काढले.
यावेळी पुढे बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले की परभणी जिल्हा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला असेल यात शंका नाही भविष्यात दोन्ही जिल्हाप्रमुखाच्या शिवसैनिकाच्या मदतीने चार विधानसभेवर भगवा फडकविणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्रा मुंजाजी चोरघडे, सूत्रसंचालन बाळासाहेब राखे ,नागेश बोरीकर यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन आयोजन समितीच्या वतीने डॉ. मनोहर ब्याळे यांनी व्यक्त केले.






















