Times Of Maharashtra News Effect : गोपाळवाडी रोड वाहतूक कोंडीवर दौंड पोलिसांची बातमी लागताच कारवाई…

Times Of Maharashtra News Effect : गोपाळवाडी रोड वाहतूक कोंडीवर दौंड पोलिसांची बातमी लागताच कारवाई…

टाईम्स ऑफ महाराष्ट्र बातमीचा इफेक्ट – वाहतूक पोलिसांची तत्काळ दखल व कारवाई

दौंड (प्रतिनिधी – संघराज गायकवाड)

दौंड, गोपाळवाडी रोड – महालक्ष्मी हॉस्पिटलसमोरील २० फुटी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बेशिस्त वाहन उभ्या ठेवण्याच्या समस्येवर Times of महाराष्ट्र न्यूज ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वाहतूक शाखेने तात्काळ कारवाई करत नागरिकांना दिलासा दिला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुरेश दत्तात्रय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या सोबत वाहतूक वॉर्डन आकाश नामदेव शिंदे, बीट हवलदार विठ्ठल गायकवाड, आणि बापू रोटे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

खाजगी गाड्या, रिक्षा, दुचाकी तसेच एमआयडीसीच्या मोठ्या बसेस यामुळे रुग्णवाहिका व नागरिकांना अपुरा मार्ग मिळत होता. विशेषतः आपत्कालीन रुग्णांसाठी ही अडचण अधिकच धोकादायक ठरत होती.

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच २६ जून रोजी वाहतूक विभागाने कारवाई करत रस्त्यावर पार्क केलेली वाहने हटवली, व वाहनचालकांना समज देण्यात आली. एमआयडीसीच्या बस चालकांशी चर्चा करत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

स्थानिक नागरिक राहुल आढाव म्हणाले, “बातमीचा तात्काळ परिणाम झाला, आम्ही टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज चॅनेलचे आभारी आहोत. ही कारवाई योग्य दिशेने पहिले पाऊल आहे. आता नियमित पेट्रोलिंग व नो पार्किंग झोनची गरज आहे.

टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज
जनतेचा आवाज… प्रशासनाची तत्परता!