Homeक्राईमगिरीम येथील बिरोबानगर येथे मेंढीपाळाचा खून; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल...

गिरीम येथील बिरोबानगर येथे मेंढीपाळाचा खून; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड तालुक्यातील बिरोबानगर, गिरीम येथे २५ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्यापूर्वी मेंढीपाळ मोहन धुळा तालवर (वय ४५) यांचा अज्ञात व्यक्तीने कु-हाडीने डोक्यात आणि गळ्यावर गंभीर जखमा करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.द.वि. संहिता १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सावळाराम धुळा तालवर (वय ३२, रा. बिरोबानगर, गिरीम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जून रोजी सकाळी ८ वाजता ते शेतात उसाचे पाचट पेटवण्यासाठी गेले होते. पाचट पेटवून घरी परतल्यानंतर त्यांनी म्हशीचे दूध काढून जाधव वाडी येथील योगेश जाधव यांच्या दूध डेअरीत दूध दिले. त्यानंतर दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे बंधू नातु धुळा तालवर यांनी फोनवर कळविले की, मोहन हा मेंढ्यांमागे नसून कुठेतरी झोपला असावा आणि मेंढ्या २-३ किमी दूर गेल्या आहेत. यानंतर सावळाराम यांनी मोटरसायकलवरून बेटवाडी येथील तंबूजवळ मोहनचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.

सावळाराम यांनी वहिनी कमल मोहन तालवर यांना ही माहिती दिली आणि पुतण्या अजित याला फोन करून मोहनचा शोध घेण्यास सांगितले. सावळाराम आणि कमल दोघेही गिरीम गावच्या हद्दीतील फॉरेस्टच्या डोंगरावर शोध घेत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मोहन जखमी अवस्थेत पालथा पडलेला आढळला. त्याच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि तो बेशुद्ध होता. जवळच रक्ताने माखलेली लोखंडी पात्याची कु-हाड आणि दोन लाकडी काठ्या आढळल्या.

सावळाराम यांनी तातडीने पुतण्या अजित आणि बाजीराव तालवर यांना ही माहिती दिली. यावेळी नामदेव झिटे यांनी चारचाकी गाडी आणली आणि मोहनला उपचारासाठी दौंड येथील महालक्ष्मी हॉस्पिटलकडे नेण्यात आले. मात्र, त्याची हालचाल होत नसल्याने त्याला यवत येथील सरकारी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणाचा तपास पो.स‌.उ. बिद्री करत असून, पो.स.उ.कदम यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेने गिरीम गावात खळबळ उडाली असून, स्थानिकांनी तातडीने आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

error: Content is protected !!