Homeक्राईमएक लाखांची लाच घेताना शनी पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी रंगेहात अटकेत

एक लाखांची लाच घेताना शनी पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी रंगेहात अटकेत

 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव शहरातील शनी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे (वय ४०, रा. पोलीस लाईन, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून ते सध्या जळगाव शहरातील शनी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

तक्रारदार हा जळगाव येथील रहिवासी असून, त्याच्या मुलाविरोधात शनी पेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

मात्र, नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन ही रक्कम एक लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी रचलेल्या सापळ्यात संशयित विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
या धडक कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण; विचारांची आजही गरज – शिवाजीराजे जाधव

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे...

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

error: Content is protected !!