Homeताज्या बातम्याआत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला मोठी चालना मिळत आहे. जोगलटेंभी, लोणारवाडी आणि कासारवाडी येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जात असून, अधिक नफा देणाऱ्या विदेशी भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांची निवड, आधुनिक लागवड तंत्र, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मल्चिंग, कीड-रोग एकात्मिक व्यवस्थापन, काढणीनंतरची हाताळणी तसेच बाजारपेठेचे नियोजन याबाबत प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक परतावा मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार व अनिल दातीर, उपकृषी अधिकारी रणजीत आंधळे, बाळासाहेब देठे, बाबासाहेब जोशी, सहाय्यक कृषी अधिकारी योगिता घोरपडे, दिव्या भोर, चेतन नागरे तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आत्मा योजनेचा उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ घडवून आणणे हा आहे. सिन्नर तालुक्यातील विदेशी भाजीपाला शेती शाळांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी प्रात्यक्षिकांमधून प्रेरणा घेऊन या पिकांची लागवड सुरू करत आहेत.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सिन्नर तालुका विदेशी भाजीपाला उत्पादनाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत असून, भविष्यात या पिकांचे क्षेत्र वाढवून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सिन्नरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

error: Content is protected !!