शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : शिरपुर भारतीय जनता पार्टी ग्रामिण, सांगवी, थाऴनेर व शहर मंडऴ तर्फे दि. १४ एप्रिल २०२६ रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरातील भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ. काशिराम पावरा, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुऴे जिप माजी अध्यक्ष तुषार रंधे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन करतो.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा मजबूत पाया दिला. सामाजिक न्यायासाठी लढा देत त्यांनी वंचित, शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे शस्त्र आहे, हा विचार रुजवून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली असे मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हा पदाधिकारी, शिरपुर ग्रामिण, सांगवी, शिरपुर शहर व थाऴनेर भाजपा मंडऴ अध्यक्ष, नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















