Homeताज्या बातम्याखेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले आहे. याप्रकरणी खरबी येथील एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडमक्ता येथील रहिवासी प्रज्वल महादेव सहारे (वय १७) यांची ट्रॅक्टर ट्रॉली २५ एप्रिल रोजी अज्ञात चोराने पळवून नेली होती. याप्रकरणी सहारे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे या गुन्ह्याचा तपास करत होते.

तपासादरम्यान, गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गितेश संतोष निशाने (वय २४, रा. खरबी) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ट्रॅक्टर ट्रॉली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पो.नि. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. मनोज खडसे, पो.ह. मुकेश गजबे, पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!