Homeताज्या बातम्यानिफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.

गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका आणि सामान्य माणसासाठी संवेदनशील व मदतीची भूमिका या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल साधत गुरव साहेबांनी निफाड तालुक्यात एक वेगळी कार्यपद्धती निर्माण केली आहे. त्यामुळे आज “गुरव पॅटर्न” हा शब्द गावागावांत चर्चेचा विषय ठरत आहे.

तालुक्यातील वाढते , गुन्हेगारी, गावांतील तणाव, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी धडक कारवाया करत कायद्याचा धाक निर्माण केला. अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही” हा संदेश त्यांनी स्पष्टपणे दिला.

मात्र दुसरीकडे एखादा गरीब शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा सामान्य माणूस अडचण घेऊन पोलीस ठाण्यात गेला तर त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी गुरव साहेब स्वतः पुढाकार घेतात. त्यामुळे “पोलीस म्हणजे फक्त धाक नाही, तर आधारही आहे,” अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

रात्रीच्या गस्तीद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष, तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि जनतेशी थेट संवाद या माध्यमातून त्यांनी पोलिसांविषयी सकारात्मक वातावरण तयार केले आहे.

अनेक गावांमधून नागरिक एकच भावना व्यक्त करताना दिसतात
गुरव साहेब आहेत म्हणून आम्ही निर्धास्त आहोत.

खाकी वर्दीत राहूनही माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून गणेशजी गुरव यांच्याकडे आज निफाड तालुका आशेने पाहत आहे. चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात आणि गुन्हेगारांसाठी कठोर निर्णय हीच त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख बनली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!