Homeताज्या बातम्याजीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? ससाणेनगर कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामावर पै....

जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? ससाणेनगर कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामावर पै. उल्हास तुपे आक्रमक

हडपसर (प्रतिनिधि धीरज महानगरे):  प्रशासन फक्त पत्रे आणि सूचना फलक लावून जबाबदारी झटकत असल्याचा राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांचा आरोप

हडपसर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने धावून जाणारे राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष तथा समाजसेवक पै. उल्हास भाऊ तुपे यांनी ससाणेनगर येथील कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ससाणेनगरकडे जाणाऱ्या कॅनाल पुलाचा पाया खचल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर पै. उल्हास तुपे यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून काम सुरू करण्यास विलंब होत असल्यामुळे त्यांनी संबंधित ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाने काम सुरू केले, मात्र काही दिवसांतच ते काम पुन्हा बंद करण्यात आले. सध्या अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात अत्यंत थर्ड क्लास दर्जाची पत्रे लावून त्यावर सूचना फलक उभे केले आहेत. मात्र प्रत्यक्षात धोकादायक स्थिती कायम असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

सद्य स्थितीनुसार रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात एखाद्या वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर गेला अथवा त्या पत्र्यांना धडक बसली, तर वाहन थेट कॅनालमध्ये कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना उल्हास तुपे यांनी व्यक्त केली आहे.

याचबरोबर हडपसर गावातील जुना पूल भविष्यात मेट्रो प्रकल्पासाठी पाडण्यात येणार असल्याची चर्चा असताना, या पुलावर तब्बल सहा कोटी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे, असा सवालही पै. उल्हास तुपे यांनी उपस्थित केला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवून प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, तसेच नागरिकांची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढे पावसाळा सुरू होणार असल्याने या पुलाच्या परिसरात मोठा अपघात होण्याची भीती अधिक वाढली आहे. रोज हजारो नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत फक्त सूचना फलक लावून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप पै. उल्हास तुपे यांनी केला आहे.

कित्येक महिन्यांपासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. निधी मंजूर होऊनही काम पूर्ण का केले जात नाही? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? सर्वसामान्य माणसाच्या जीवाला काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ न करता प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून पुलाचे रखडलेले काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!