Times Of Maharashtra Desk : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा केली असून, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
लाडकी बहीण योजना आणखीन सक्षम होणार .
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजना सुरू झाल्यापासून ती सातत्याने चर्चेत राहिली आहे. कधी हप्त्यांच्या वितरणावरून, कधी ई-केवायसी प्रक्रियेवरून, तर कधी इतर तांत्रिक अडचणींमुळे ही योजना चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली होती. कोट्यवधी महिलांनी आपले ई-केवायसी अपडेट पूर्ण केले आहे.
आता फोन करा 181 वर
आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.
या हेल्पलाइनवर संपर्क साधून लाभार्थी महिलांना
- अर्जातील चुका
- पैसे न मिळण्याच्या तक्रारी
- ई-केवायसी संदर्भातील अडचणी
- इतर कोणत्याही शंका
यांचे निरसन करून घेता येणार आहे. आवश्यकता असल्यास लाडक्या बहिणींनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.
या निर्णयामुळे योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, अर्जातील चुकांमुळे अडलेल्या महिलांसाठी ही सुविधा






















