Homeताज्या बातम्यामातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त होते . याच विचारातून बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज मौजे जरूड येथे भेट देत एकाच दिवशी शिक्षण आणि शेती या ग्रामीण जीवनाच्या दोन महत्त्वाच्या घटकांशी थेट संवाद साधला .
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह , नवीन पुस्तके , नवीन गणवेश आणि नव्या स्वप्नांची चाहूल यामध्ये सहभागी होत तहसीलदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण , शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले . ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील सक्षम नागरिक असून शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडू शकते , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत , जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ती पूर्ण करावीत , असे आवाहनही त्यांनी केले .
त्यानंतर त्यांनी जरूड परिसरातील शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला . यंदाच्या मान्सूनची स्थिती , पावसाचे अनियमित आगमन आणि खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . काही ठिकाणी जमिनीची मशागत , वखरणी , पाळे देण्याची कामे सुरू असल्याची पाहणी करण्यात आली .
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घाईघाईने पेरणी करू नये , असा सल्ला दिला . प्रारंभीच्या हलक्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केल्यास पुढे पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते . त्यामुळे पुरेसा आणि समाधानकारक पाऊस होईपर्यंत किमान चार ते आठ दिवस संयम ठेवावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा , असे त्यांनी सांगितले .

शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्यक्ष औत हाती घेत शेतातील पाळीचे काही मोड घातले . प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात उतरून त्यांच्या कामात सहभागी झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले . शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही वेळोवेळी शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन वैज्ञानिक शेतीचा अवलंब करावा , असे आवाहन केले असून अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी खरीप हंगामात महसूल व कृषी यंत्रणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे . उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीदेखील पेरणीपूर्व नियोजन , जलसंधारण आणि जोखीम व्यवस्थापनावर भर देण्याचे मार्गदर्शन केले आहे . या पार्श्वभूमीवर तहसीलदार शेळके यांची जरूड येथील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे .
यावेळी जरूडचे सरपंच श्रीराम काकडे , उपसरपंच पंजाब काकडे , ज्येष्ठ शेतकरी भगवान काकडे , कल्याण काकडे , लक्ष्मण काकडे , रामनाथ काकडे , महादेव काकडे , आप्पाराव काकडे , विनोद कोरडे तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते . उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीविषयक विविध प्रश्न मांडले असून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली .
ग्रामीण भागातील शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रांशी प्रशासनाने जपलेली ही जवळीक लोकाभिमुख प्रशासनाचे उदाहरण ठरत आहे . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि शेतात शेतकऱ्यांशी साधलेला जिव्हाळ्याचा संवाद या दोन्ही गोष्टींमधून प्रशासनाचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला . गाव , शाळा आणि शेत यांना जोडणारी ही भेट जरूड परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!