सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित पोस्टचा निषेध नोंदवला.
आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिलांविषयी तसेच सार्वजनिक पदांवरील व्यक्तींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
या आंदोलनात नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुभाष कुंभार, आरोग्य सभापती ललिता हांडे, शिक्षण व क्रीडा सभापती कांताताई जाधव, नगरसेवक ॲड. पंकज जाधव, शेखर गोळेसर, सुदर्शन नाईक, विलास जाधव, विजय वरंदळ, सुनील गवळी, दत्ता हांडे, किरण गोजरे, योगानंद गवळी, ज्ञानेश्वर उबाळे, अनिल गायकवाड, संजय नवसे, समर्थ उगले, सचिन मचकुले आणि ऋषी भोर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी संबंधित प्रकरणाचा निषेध करत अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.






















