कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब दानवे पाटील यांनी सन्मानपूर्वक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कन्नड तालुक्यातील भाजप नेते व उद्योजक मनोज भाऊ पवार उपस्थित होते.
दर्शनावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी तसेच सर्व नागरिकांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी खातखेडा येथील भाजपाचे प्रमोदजी पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात दर्शन सोहळा संपन्न झाला.



