Homeताज्या बातम्याबीड येथे महसूल दिन उत्साहात साजरा ; आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली...

बीड येथे महसूल दिन उत्साहात साजरा ; आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबीर व राजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा महसूल दिन यावर्षी बीड जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ व ‘ राजस्व अभियान ‘ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला नागरिक , शेतकरी , महिला , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली . नागरिकांच्या महसुली समस्या एका छताखाली सोडविणे , शासनाच्या सेवा लोकांपर्यंत थेट पोहोचविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले .
शनिवार , 01 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अंबिका लॉन्स , पांगरी रोड , बीड येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर होते . तसेच विशेष निमंत्रित योगेश क्षीरसागर , विविध प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , परिविक्षाधीन आयएएस दिव्यांक गुप्ता , अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी , सुनील शेरखाने , दीपक वजाळे , कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी , राजपत्रित अधिकारी , महसूल अधिकारी , तलाठी , मंडळ अधिकारी , कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली . त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . शिवस्वराज्याच्या विचारांना अभिवादन करत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला . कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी पोवाडा सादर करण्यात आला . या पोवाड्याने उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान आणि शिवस्वराज्याच्या विचारांप्रती नवचैतन्य निर्माण केले . यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला . विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे , सनद , दाखले तसेच अन्य शासकीय सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला . उपस्थित नागरिकांनी महसूल प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले .
शिवकुमार स्वामी यांनी आपल्या मनोगतात महसूल विभागाची बदलती कार्यपद्धती , डिजिटल सेवा , पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवा यावर विशेष भर दिला . महसूल दिन हा प्रशासन आणि जनतेतील विश्वास अधिक दृढ करणारा दिवस असल्याचे सांगत प्रत्येक अधिकाऱ्याने नागरिकांशी सुसंवाद वाढवून लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा संकल्प करावा , असे आवाहन केले .
संदीपभैय्या क्षीरसागर यांनी विचार मांडताना बदलत्या काळानुसार प्रशासनात नव्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली . नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाने अधिक गतिमान होण्याची गरज असून अशा समाधान शिबिरांमुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल , असे ते म्हणाले .
डॉ योगेश क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अशा उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले . त्यांनी महसूल विभागाच्या कार्याचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन हे केवळ राज्यकारभाराचे नव्हे तर लोककल्याणाचे आदर्श मॉडेल होते . महाराजांनी प्रामाणिक महसूल व्यवस्था उभी करून शेतकरी आणि सामान्य जनतेला न्याय दिला . त्याच विचारातून राबविण्यात येत असलेले हे महाराजस्व समाधान शिबीर प्रशासनाला अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख बनविणारे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले . बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले .
अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांनी अधिकारी वर्गाने सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन वेळेत आणि नियमांनुसार त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला . महसूल प्रशासन म्हणजे केवळ कागदोपत्री कामकाज नसून नागरिकांच्या विश्वासाशी जोडलेली सेवा असल्याचे सांगितले . प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेशी संवेदनशीलतेने वागून त्यांचा विश्वास जिंकण्याचे आवाहन त्यांनी केले .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महसूल विभाग अधिक गतिमान , पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नागरिकांना दिली . नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नये , त्यांच्या महसुली समस्या जागेवर सोडविण्यात याव्यात आणि विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात , हा या अभियानामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
या समाधान शिबिरामध्ये सातबारा उताऱ्यावरील त्रुटी दुरुस्ती , फेरफार नोंदी , वारस नोंदी , ई – मोजणी संदर्भातील मार्गदर्शन , शेतकरी प्रमाणपत्र , महिला शेतकरी प्रमाणपत्र , स्वामित्व सनद , विविध महसुली दाखले , ई – शिधापत्रिका , कृषिकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे , जमिनीसंबंधी प्रलंबित प्रकरणे , ऑनलाइन महसुली सेवा तसेच विविध विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली . विविध शाखांचे अधिकारी दिवसभर नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहून अनेक प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले . उपस्थित मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम , पोवाडा सादरीकरण , लाभार्थी सन्मान , अधिकारी – कर्मचारी गौरव आणि मार्गदर्शनपर भाषणांमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे , प्रशांत जाधवर , अण्णासाहेब वंजारे , संभाजी थोटे , पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर , तालुका कृषी अधिकारी अविनाश साळी , सहाय्यक महसूल अधिकारी महादेव चौरे , राहुल कसबे , श्रीराम वाघमट , संतोष मुळीक , हेमलता परचाके , क्रांती इंगळे , मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे , पुरुषोत्तम आंधळे , शीतल चाटे , सतीश बांगर , अंगद काशीद , महसूल सहाय्यक सरोजिनी बोराडे , वैशाली बहिरवाळ , भरत भंडणे , ग्राम महसूल अधिकारी सचिन एरंडे , शब्बीर पठाण , हरिदास काकडे , महसूल सेवक तथा दिनेश माने , संभाजी शिंदे , अरविंद राऊत , जिल्हाध्यक्ष कोतवाल संघटना गणेश चव्हाण , रेवननाथ पवार , ऑपरेटर दिनेश कोरडे तसेच तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी , आपले सेवा सरकार केंद्राचे केंद्रचालक , बीड तालुक्यातील व बीड मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी , शेतकरी , लाभार्थी आणि नागरिक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला .
‘ राजस्व अभियान ‘ तथा ‘ महसूल दिन ‘ यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी , कर्मचारी , तलाठी , मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी , कोतवाल , सेवा केंद्र चालक तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अनेक दिवस नियोजनपूर्वक मेहनत घेतली .
महसूल दिन हा केवळ एका विभागाचा उत्सव नसून शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा दिवस असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले . ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ आणि ‘ राजस्व अभियान ‘ या माध्यमातून महसूल प्रशासनाने लोकाभिमुख , पारदर्शक , संवेदनशील आणि गतिमान प्रशासनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविला . कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महसूल विभागावरील नागरिकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...
error: Content is protected !!