Homeताज्या बातम्यागेवराई तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे अकाली निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

गेवराई तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे अकाली निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

गेवराई: (प्रतिनिधी) दैनिक ‘झुंजार नेता’चे गेवराई तालुका प्रतिनिधी आणि आपल्या निर्भीड लेखणीने समाजमनाचा वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी रुग्णालयात उपचार सुरू असताना अकाली निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रावर आणि मित्रपरिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिंदे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने काल शुक्रवारीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते लवकरच बरे होऊन पुन्हा आपल्या सहकाऱ्यांमध्ये सक्रिय होतील, अशी आशा सर्वांना होती. मात्र, शनिवारी दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. कालपर्यंत घरी परतण्याची आशा असताना आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे तलवाडा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सुभाष शिंदे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. आपल्या निर्भीड, परखड आणि निःपक्षपाती पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच शहरी भागातही पत्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.सुभाष शिंदे यांनी आपल्या दीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत नेहमीच शोषित, पीडित आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी कधीही आणि कोणाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर इतरांचे सुख-दुःख, त्यांच्या समस्या आणि त्यांचा संघर्ष आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणारा एक जिवंत आवाज आज कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातील एका प्रामाणिक आणि लढवय्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी जड अंतःकरणाने शोक व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

error: Content is protected !!