Homeक्राईमसासरच्या छळाचा संशय : जळगावात गर्भवती महिलेसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत मृत्यू

सासरच्या छळाचा संशय : जळगावात गर्भवती महिलेसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत मृत्यू

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : तालुक्यातील एका आदिवासीबहुल गावात सासरच्या मंडळींच्या कथित छळामुळे गर्भवती महिला व तिच्या दोन लहान मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) तसेच तिचा आठ वर्षांचा मुलगा विवेक आणि अवघ्या पंधरा दिवसांचे बाळ यांचे मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत महिलेचा भाऊ आकाश पावरा यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, पमिता नुकतीच बाळंत झाली होती व प्रकृती अस्वस्थ असल्याने माहेरी आली होती. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी पती व सासरच्या मंडळींनी तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत जबरदस्तीने तिला सासरी घेऊन गेले. त्यानंतर मंगळवारी पमिता दोन्ही मुलांसह बेपत्ता झाली होती.

बुधवारी मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी मोठी गर्दी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालात पमिताच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून सासरच्या छळाचा मुद्दा तपासाच्या केंद्रस्थानी आहे. घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!