Homeआरोग्यबारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू, कळवा-मुंब्रादरम्यान हृदयद्रावक घटना

बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू, कळवा-मुंब्रादरम्यान हृदयद्रावक घटना

Times Of Maharashtra Desk : ठाणे बारावीच्या पहिल्याच परीक्षेच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, डोंबिवली पूर्व येथील रहिवासी सोहम कटरे (वय १८) या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडली.

सोहम कटरे हा बारावीच्या परीक्षेला बसला होता. मंगळवारी त्याचा पहिलाच पेपर असल्याने तो सकाळी लवकर घरातून निघाला होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालय येथे होते. नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करत असताना लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभा असलेला सोहम अचानक तोल जाऊन खाली पडला. वेगात धावणाऱ्या लोकलखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोहमला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सोहम हा अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका विद्यार्थी होता. पहिल्याच पेपरच्या दिवशी अशी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डोंबिवली आणि कळवा परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमधून प्रवास करणे आता जीवघेणे ठरत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!