Homeताज्या बातम्यापाचोर्यात तुटलेल्या सर्व्हिस वायरचा तरुणाचा बळी; महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व ₹50...

पाचोर्यात तुटलेल्या सर्व्हिस वायरचा तरुणाचा बळी; महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व ₹50 लाख भरपाईची मागणी

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): पाचोरा येथे तुटलेल्या सर्व्हिस वायरचा तरुणाच्या जीवावर बेतला; निष्काळजीपणाबद्दल महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबाला किमान ₹50 लाखांची भरपाई द्यावी
पाचोरा शहरातील मढगाव परिसरात तुटलेल्या वीज वितरण कंपनीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन २३ वर्षीय लोकेश दत्तात्रय जडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरालगत असलेली सर्व्हिस वायर काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होती. मात्र तिची वेळेत दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या निष्काळजीपणाची किंमत एका तरुणाला आपला जीव गमावून मोजावी लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शी व स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, लोकेश जडे हे घराच्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात असताना अचानक वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. धक्क्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत जर वीज वितरण यंत्रणेने वेळेत धोकादायक वायरची दुरुस्ती केली असती, तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
याचबरोबर, मृत लोकेश जडे यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL / महावितरण) यांनी नैतिक व कायदेशीर जबाबदारी स्वीकारून मृताच्या कुटुंबाला किमान ₹50 लाखांची आर्थिक भरपाई द्यावी, तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला नोकरी देण्याचाही विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धोकादायक वीज वाहिन्या, सर्व्हिस वायर आणि विद्युत उपकरणांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे आणखी कोणाचाही बळी जाऊ नये, यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच

0
दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६...

error: Content is protected !!