जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी बालक आणि बाळंत मातांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. निरोगी बालक हे देशाचे भविष्य असून, प्रत्येक बालकाला वेळेत लसीकरण मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांना आपल्या मुलांना पोलिओची लस देण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांनी माहिती देताना सांगितले की, ३० जूनपासून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घराघरात जाऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सोंढळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने शहरातील सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजण्याचे आवाहन केले असून, पोलिओमुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा जल्लोषात शुभारंभ; ३० जूनपासून घराघरात लसीकरण मोहीम लहान मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजून जनजागृतीला सुरुवात
RELATED ARTICLES
- Advertisment -
आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...
लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...
सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.
✍️.....Nilesh Thakre
आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच
दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६...