Homeताज्या बातम्यालोंबकळलेल्या वीजतारा ठरताहेत धोकादायक परिस्थिती, गंगाखेड महावितरण कंपनीच्या दुर्लक्षाने शहरातील नागरिकांत संताप

लोंबकळलेल्या वीजतारा ठरताहेत धोकादायक परिस्थिती, गंगाखेड महावितरण कंपनीच्या दुर्लक्षाने शहरातील नागरिकांत संताप

परभणी(प्रतिनिधी अनिल शेटे): गंगाखेड शहरात मासोळी कॅम्प येथे झाड पडून वाकलेल्या वीज खांबामुळे वीज प्रवाह तारा रस्त्यावर लोंबकळत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने मासोळी कॅम्प येथील लोकांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गंगाखेड तालुक्यातील मासोळी कॅम्प येथील गल्लीमधील मुख्य रस्त्यावर वीज खांब वाकल्याने वीज पुरवठा करणाऱ्या वीज तारा लोंबकळत आहे.त्यामुळे याठिकाणांहून जाणाऱ्या -येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.गत पंधरा दिवसापासून लोबकळत असलेल्या तारा दुरूस्ती करण्यासाठी शहर अभियंत्याना वेळ मिळत नाही.दुर्घटनेची वाट पाहतात असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात.

याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गंगाखेड तालुक्यात शहरी भागात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी विजेचा प्रवाह असलेल्या वीज तारा लोंबकळतात. येथील खांब वाकल्याने या वीजतारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. यासंदर्भात अनेकदा महावितरण कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र, लोंबकळणाऱ्या वीज तारांची स्थिती जैसे थे आहे. मासोळी कॅम्प येथील नागरिक यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर विजेच्या तारा पूर्णपणे लोंबकळत आहेत
या तारा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना लागत असल्याने कोणत्याही क्षणी याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीला लोंबकळत असलेल्या वीज तारा सुरळीत करून देण्याची विनंती केली.मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने लोंबकळत असलेल्या जिवंत विद्युत तारांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे लोंबकळत असलेल्या जिवंत वीज तारा सुरळीत करण्याची मागणी मासोळी कॅम्प येथील नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच

0
दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६...

error: Content is protected !!