Homeताज्या बातम्यागरज पढल्यास अजित पवारांना रुग्णालयात दाखल कराव लागेल; डॉक्टररानी दिली महत्वाची माहिती

गरज पढल्यास अजित पवारांना रुग्णालयात दाखल कराव लागेल; डॉक्टररानी दिली महत्वाची माहिती

गरज पढल्यास अजित पवारांना रुग्णालयात दाखल कराव लागेल; डॉक्टररानी दिली महत्वाची माहिती…

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे वातावरण पेटलं आहे. मराठा आंदोलक आक्रमक होत राजकीय नेत्यांना लक्ष करत आहेत. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत खालावली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांना डेंग्यु झालाय अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती. त्यानंतर आता अजित पवारांवर उपचार करणारे डॉ. संजय कपोटे यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे.

डॉ. संजय कपोटे म्हणाले की, गेल्या ४-५ दिवसांपासून अजित पवारांना डेंग्यू झाला आहे. NS1 पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आजही १०१ से. ताप आहे. अजित पवारांच्या प्लेट्सरेट दिवसेंदिवस कमी होत आहेत. आधी १ लाख ६० हजार होते, आता मंगळवारी रात्री ते ८० हजारांवर आलेत. शरीरातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या आहेत. बुधवारी म्हणजे आज अजित पवारांची वैद्यकीय चाचणी करून त्यात काही विशेष आढळले तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं.

तर सध्या आम्ही घरीच अजित पवारांना सलाईन दिले आहे. औषधोपचार सुरू आहेत. परंतु अजित पवारांना थकवा आलाय. अशक्तपणा प्रचंड वाढला आहे. अजित पवारांना विश्रांतीची गरज आहे. तब्येत ठीक केवळ सांगण्यापुरते आहे. त्यांना अशक्तपणा खूप आहे. कोविडमुळे आणि इतर व्हायरसमुळे आलेला अशक्तपणा जायला कधी कधी महिनाही लागतो. सध्या विकनेस खूप आहे. त्यात अजित पवारांना १०१ से. ताप आहे असंही डॉ. संजय कपोटे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाची परिस्थिती चिघळली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती प्रखरतेने जाणवत आहेत. त्यातच विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवारांना राजकीय आजार झाला असल्याची टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री प्रचाराला दुसऱ्या राज्यात जातात तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!