Homeताज्या बातम्यासीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गुळवंच एमआयडीसीतील उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुळवंच एमआयडीसीमध्ये सध्या सुमारे ६० ते ७० उद्योगांचे बांधकाम वेगाने सुरू असून, गेल्या वर्षभरापासून नियमित पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पाणीटंचाईमुळे उद्योगांना टँकरद्वारे पाणी आणावे लागत असल्याने लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. मात्र, सिन्नर शहरातील काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम गेल्या आठ महिन्यांपासून रखडले होते.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन सीमा संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. सीमाच्या शिष्टमंडळाने सोमठाणे येथे आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आमदार कोकाटे यांनी तात्काळ सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्याशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली.
नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनीही तत्काळ एमआयडीसी प्रशासनाशी समन्वय साधत अडकलेले काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले.
सीमा संघटनेचे सहसचिव मुकेश देशमुख यांनी सांगितले की, सदर काम पूर्णत्वास जावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर त्याला यश आले.
लवकरच गुळवंच एमआयडीसीतील उद्योगांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, टँकरवरील लाखो रुपयांचा खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच औद्योगिक विकासालाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
या यशस्वी पाठपुराव्याबद्दल सीमाच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे आणि नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या शिष्टमंडळात सीमाचे सचिव बबन वाजे, विश्वस्त रतन पडवळ, सहसचिव मुकेश देशमुख, शरद टरले, अरुण खालकर तसेच गुळवंच एमआयडीसीतील उद्योजक बाबासाहेब दळवी, राजेंद्र नाजगड, संतोष मुटकुळे, गोकुळ डुंबरे, दत्ता तांबे यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

error: Content is protected !!