दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल जगदाळे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सन्मान समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ श्री. विलास बर्वे यांच्यासह दौंड शहरातील २५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्षा कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे तसेच ज्येष्ठ नेते नंदूभाऊ पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शिल्ड, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले, “ज्येष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती असून ती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या गावातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेणे ही अत्यंत मोलाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सन्मानाची व कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होते.”
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ विधीतज्ञ श्री. विलास बर्वे म्हणाले, “नगराध्यक्षा कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आता आले आहेत. दौंड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक प्रथमच निवडून आल्यामुळे त्यांच्यासाठी प्रशासनाच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा घेण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेणे व लोकाभिमुख विकासकामे प्रभावीपणे करणे अधिक सोपे होईल.”

पुढे बोलताना त्यांनी, “माझा आपण सर्वांनी सन्मान केला त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,” असे सांगितले.
यावेळी नगरसेवक इंद्रजित जगदाळे, जिवराज (बापू) पवार, विकास लोंढे, मुकेश जगताप, मंगेश चलवादी, नगरसेविका स्वाती सावंत, प्रणिता शिंदे, राणी लष्करे, रुपेश जाधव, साधना सोनवणे, अनिल साळवे, प्रशांत धनवे, दीपक सोनवणे, अनिल जगताप, जाकीरभाई शेख तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, वीरधवल जगदाळे युवा मंचचे सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल स्वामी यांनी केले.






















