Homeताज्या बातम्याउच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवीतील १२ आणि इयत्ता सातवीतील १३ अशा एकूण २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल विद्यालयात त्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक राम ढोली यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी शिक्षकांचे परिश्रम, विशेष मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव परीक्षा आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि पालकांना दिले. पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या गौरव सोहळ्यास तालुका संचालक कृष्णाजी भगत, शालेय समिती सदस्य बबनरावजी ठोक गुरुजी, डॉ. विजय लोहारकार, अनंत उगले, गौरीताई गायकवाड, विशाखा समिती सदस्य मनीषा जाधव, मुख्याध्यापक राम ढोली, उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग करपे यांनी केले. उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

error: Content is protected !!