Homeताज्या बातम्याडॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत...

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते. मग मानवी जीवनाशी थेट संबंधित असलेल्या आरोग्य विभागालाच सुट्ट्यांचा आजार का जडला आहे, असा संतप्त सवाल ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेकडून विचारला जात आहे. शासनाने आरोग्य विभागाला शनिवार आणि रविवारची सुट्टी नेमकी कशासाठी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत असून ब्रह्मपुरीतील रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

ब्रह्मपुरी शहर व परिसरातील ग्रामीण जनतेसाठी शासकीय रुग्णालय हाच एकमेव मोठा आधार आहे. मात्र, शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी येथील बाह्यरुग्ण विभाग ओपीडी आणि इतर महत्त्वाच्या सेवा संथ गतीने चालतात. आपत्कालीन सेवांचा दावा केला जात असला, तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागते. गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना थेट नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला जातो.

शासकीय व्यवस्था सुट्टीवर असताना रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार असतो. मात्र, ब्रह्मपुरीतील सर्वच नामांकित खाजगी डॉक्टर शनिवार आणि रविवार येताच शहरातून गायब होतात. हे डॉक्टर मौज-मस्ती करण्यासाठी नागपूर, मुंबई, पुणे, गोवा यांसारख्या पर्यटनस्थळांवर जातात. तर काही डॉक्टर मोठ्या शहरांमधील नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जाऊन शस्त्रक्रिया करण्यात व्यस्त असतात. यामुळे शनिवार-रविवार स्थानिक खाजगी रुग्णालयांचे शटर अर्धवट उघडे असले तरी तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची धूळ खात खुर्ची असते डॉक्टर मात्र गायब डॉक्टर नागपूर मुंबई, पुणे ,गोवा या ठिकाणी मोजमस्तीसाठी गेले असतात.

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ब्रह्मपुरी शहरात वैद्यकीय आणीबाणी इमर्जन्सी निर्माण झाल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात हलवताना लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेतच कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पैशांअभावी गरीब रुग्ण खाजगी आणि महागड्या रुग्णालयांचा खर्च पेलू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

“पोलीस आणि अग्निशमन दलाप्रमाणे आरोग्य सेवा ही सुद्धा अत्यावश्यक सेवा आहे. मग डॉक्टरांना शनिवार-रविवारची सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडण्याचे धोरण शासनाने का आखले?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे. शनिवार-रविवार रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती अनिवार्य करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरवर किंवा खाजगी हॉस्पिटलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

error: Content is protected !!