Homeताज्या बातम्याजळगाव समाजकल्याण विभागातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरणगावात शोककळा, पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव समाजकल्याण विभागातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरणगावात शोककळा, पोलिसांकडून तपास सुरू

वरणगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जळगाव समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या पूजा गोपाळ जवळकर (वय 29) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे समाजकल्याण विभागासह वरणगाव परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा जवळकर या जळगाव येथील समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. त्या वरणगाव येथील मकरंद नगर परिसरात आपल्या दोन लहान मुलांसह वास्तव्यास होत्या. कौटुंबिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळत नोकरी करत होत्या.
बुधवारी (22 जुलै) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाली. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, कुटुंबीय व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पूजा जवळकर यांच्या अकाली निधनामुळे समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!