परभणी:(प्रतिनिधि अनिल शेटे) लहान चिमुकल्यांसाठी अहो रात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवणारी रुद्राक्ष इंग्लिश स्कूल तेथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी भगवान पांडुरंग यांची वेशभूषा आणि विद्यार्थिनींनी माता रुक्मिणी यांची वेशभूषा प्रदान करून हा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्याने फुगडी, शतपावली विठ्ठलाच्या गाण्यांवर डान्स करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संस्थाचालक श्री धनराज मुंडे, श्री. महादेव केंद्रे ,मुख्याध्यापिका सुनीता फड, ऋतुजा गव्हाणे , राजश्री गिरी ,शकुंतला साळवे ,राम लटपटे ,ओमकार गुट्टे आणि पालक वर्ग उपस्थित होता.विद्यार्थी यांना फराळाचे वाटप करून या सर्वांनी या चिमुकल्यासोबत आषाढी एकादशीचा आनंद घेतला.






















