Homeताज्या बातम्याकंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!'; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बांधकामाच्या बाजूने जनतेला ये-जा करण्यासाठी सुयोग्य पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यातच सद्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे या तात्पुरत्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘खरबी नाक्यावरील’ टोल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ओबीसी विभाग) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत यांनी तहसीलदार व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावर सध्या केसीसी या कंपनीकडून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. शासकीय नियमांनुसार आणि कामाच्या अधिकृत आदेशानुसार कोणत्याही मुख्य रस्त्याचे बांधकाम किंवा दुरुस्ती करताना संबंधित कंत्राटदाराने नागरिकांच्या वाहतुकीसाठी काँग्रेट दर्जेदार व सुरक्षित पर्यायी मार्ग तयार करून देणे बंधनकारक असते. एवढेच नव्हे तर, या पर्यायी रस्त्याच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी मूळ बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद देखील केलेली असते. असे असतानाही, सदर कंत्राटदाराने या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली असून, अत्यंत निकृष्ट व चिखलमय रस्त्यावरून चालण्यासाठी नागरिकांना भाग पाडले आहे. यामुळे या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, जनतेच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याची पूर्ण वाट लागलेली असताना आणि प्रवास सुरक्षित नसतानाही, या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांकडून ‘खरबी नाक्यावर’ राजरोसपणे व सक्तीने टोल वसूल केला जात आहे. “एकीकडे कंत्राटदार नागरिकांना साधा चालणाऱ्या साठी रस्ता देऊ शकत नाही, तर दुसरीकडे खराब रस्त्यासाठी जनतेकडून टोल वसूल करणे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहे,” असा संतप्त सूर स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

या अत्यंत गंभीर समस्येची दखल घेत लोकप्रतिनिधी अविनाश आनंदराव राऊत, प्रदिप दोनाडकर, महेश भागकर व इतर नागरिकांनी ब्रम्हपुरीच्या तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून अधिकृत निवेदन सादर केले. प्रशासनाने तात्काळ केसीसी कंपनीच्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजवावी आणि तातडीने तिथे खडीकरण करून रस्ता ये-जा करण्यासाठी काँग्रेट रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत खरबी नाक्यावरील टोल आकारणी थांबवण्याचे आदेश निर्गमित न केल्यास, जनतेच्या सुरक्षिततेसाठी व हक्कांसाठी तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

error: Content is protected !!