Homeताज्या बातम्याबनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व भाजप नेते संजय गरुड यांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी काही संस्था चालक व संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक एसआयटीच्या पथकाने सोलापूरजवळील नातेपुते परिसरातून संजय गरुड यांना ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून ते तपास यंत्रणांना चकवा देत असल्याची चर्चा होती. अखेर विशेष पथकाने त्यांना शोधून ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, शेदूर्णी एज्युकेशन संस्थेतील सुमारे १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अत्यंत कमी कालावधीत तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आयडींच्या आधारे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता तपासली जात असून, आर्थिक गैरव्यवहाराचा तपासही सुरू आहे.
यापूर्वी या प्रकरणात निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय गरुड यांच्यावरील कारवाईला या तपासातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. तपासाचा विस्तार होण्याची शक्यता असून, आणखी काही संस्था चालक, शिक्षण अधिकारी आणि संबंधित व्यक्ती एसआयटीच्या रडारवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
संजय गरुड हे जामनेर मतदारसंघातील परिचित राजकीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्य केले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असून, न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व व्यक्तींना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते. तपासातून पुढे येणाऱ्या अधिकृत माहितीनुसारच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

पुणे मनपाचा अजब कारभार! शासनाने मुलाखती केल्या रद्द, तरीही महापालिकेत ‘अर्थपूर्ण’ मुलाखतींचा घाट; उपायुक्त...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): राज्य सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी गट 'ब' आणि गट 'क' पदांच्या भरतीसाठी मुलाखती रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

error: Content is protected !!