Homeताज्या बातम्याधुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन
जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले.
पवार यांच्या हस्ते सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, अधीक्षक अभियंता सायस दराडे, सहायक महाव्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, महावितरणच्या प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्याचा जीव अनमोल आहे. अपघात झाल्यास कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणत्याही कामाच्या वेळी सुरक्षा साधने वापरावीत. त्यासाठी सांघिक कार्यालयाने केंद्रीय स्तरावर खरेदी करून सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुरक्षा साहित्य पुरवले आहे. त्याचा उपयोग करा आणि ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी कटिबद्ध राहा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पवार यांनी दोन्ही मंडलातील मानव संसाधन विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. मानव संसाधन विभागाने व्यवस्थापनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासोबतच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनल्स आणि शिस्तभंग कारवाईशी संबंधित प्रकरणांचा निर्धारित वेळेत आणि वेगाने निपटारा करण्याची सूचनाही पवार यांनी आढावा बैठकीत दिली.
बैठकीस कार्यकारी अभियंते अतुल गायधनी, युगलकिशोर प्रसाद, मनीषा कोठारी, प्रताप मचिये, भाऊसाहेब पाटील, प्रीतम काळे, जितेंद्र महाजन, व्यवस्थापक (मा.सं.) नरेश प्रसाद, राजेंद्र गोसावी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कॅप्शन : महावितरणच्या धुळे मंडलातील तांत्रिक कर्मचाऱ्यांना संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते सुरक्षा साहित्य देण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, अधीक्षक अभियंता सायस दराडे, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व तांत्रिक कर्मचारी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

पुणे मनपाचा अजब कारभार! शासनाने मुलाखती केल्या रद्द, तरीही महापालिकेत ‘अर्थपूर्ण’ मुलाखतींचा घाट; उपायुक्त...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): राज्य सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी गट 'ब' आणि गट 'क' पदांच्या भरतीसाठी मुलाखती रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा...

error: Content is protected !!