Homeताज्या बातम्याइतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला...

इतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला आमदाराचा सुप्रिया सुळेंना सवाल…

इतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला आमदाराचा सुप्रिया सुळेंना सवाल…

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात हिंसक आंदोलन पेटलं आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. सुप्रिया सुळेंच्या सरकारवरील टीकेला उत्तर देताना ४० वर्षात तुमच्या वडिलांनी मराठा आरक्षणासाठी काय केले असा सवाल करत आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, ४० दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी सरकारने काय केले असा प्रश्न सुप्रिया सुळे विचारतात पण १९८० माझा मराठा समाज आरक्षण मागतोय. तेव्हापासून आपले वडील शरद पवार यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले. सत्ता आपल्या वडिलांकडे आणि घराण्याकडे दिली. आज ४० वर्षात आपण समाजासाठी काय केले हे मी मराठा समाजाची मुलगी म्हणून तुम्हाला विचारते. ४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलं.

तसेच मनोज जरांगे पाटीलांचे उपकार माना, आज त्यांनी मराठा समाज एकत्र आणला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आणि तेच आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवले. त्यानंतर तुमचे वडील शरद पवार यांच्या कृपेने महाराष्ट्रावर लादलेले सरकार आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला मिळालेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा आपण मूग गिळून गप्प का होता या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेला अपेक्षित आहे असा टोलाही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.

दरम्यान, आज तुम्ही आरक्षणासाठी कळवळ व्यक्त करतायेत, परंतु राज्यातील संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आम्हा सर्वांना मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. आम्ही देखील सत्ताधारी आमदार असलो तरी आरक्षणासाठी सरकारला जाब विचारू, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण तुम्ही समाजातील तरुण मुलांच्या भावना भडकवण्याचे काम करू नये अशी विनंतीही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!