Homeताज्या बातम्यामोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया...

मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया…

मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया…

पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सोमवारी (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.

या सभेमध्ये मोदींनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. या टीकेवर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

महाराष्ट्र एका ‘भटकत्या आत्म्या’चा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भाषणामध्ये शरद पवारांवर निशाणा साधला. “महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. ४५ वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली,” असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांवर निशाणा साधला. “तेव्हापासून (मागील ४५ वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. १९९५ महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला,” असंही मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) :  गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच...

error: Content is protected !!