Homeताज्या बातम्यासहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अटक बालकाची तीन लाखांत विक्री...

सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अटक बालकाची तीन लाखांत विक्री…

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी बालकाची तीन लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंडी (वय २४, रा. जंबगी, जि. विजापूर, कर्नाटक) आणि सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी बालकाला सुभाष कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) याला विकल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दांपत्य यवतमाळ येथून पुण्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. रात्री ते पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी पहाटे दोनच्या सुमारास आईजवळ झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाला उचलून नेले. याबाबत तेलंग यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्हीमधील चित्रीकरण तपासले. 

त्यात संशयित आरोपी कोणत्या मार्गाने गेले हे दिसून येत नव्हते. आरोपी मोटारीतून गेले असावे, असा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासात आरोपी कर्नाटक राज्यातील विजापूरला गेल्याचे निष्पन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) :  गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच...

error: Content is protected !!