Homeताज्या बातम्याअवघ्या तीन दिवसांत १० हजार पेक्षा जास्त महिलांनी केली "महिला सम्मान बचत...

अवघ्या तीन दिवसांत १० हजार पेक्षा जास्त महिलांनी केली “महिला सम्मान बचत पत्र” योजनेत ३९ कोटी रुपयांची गुंतवणूक…

अवघ्या तीन दिवसांत १० हजार पेक्षा जास्त महिलांनी केली “महिला सम्मान बचत पत्र” योजनेत ३९ कोटी रुपयांची गुंतवणूक…
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), केंद्र शासनाने २०२३- २०२४ च्या अर्थ संकल्पात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी, दोन वर्षे या अल्प मुदतीसाठी महिला सम्मान बचत पत्र” ही बचत योजना जाहीर केली आहे. सदर योजना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत लाभ दायक ठरली आहे.
भारतीय डाक विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाने दिनांक २३.०६.२०२३ ते २६.०६, २०२३ असे तीन दिवसांचे “महिला सम्मान बचत पत्र” योजने अंतर्गत १०,००० खाती उघडण्यासाठी विशेष अभियान राबविले. पुणे शहर पूर्व विभागातील ६५ पोस्ट ऑफिसेस मधील सर्व कर्मचारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रचंड उत्साहाने दिनांक २४ जून शनिवारी पहाटे पासूनच सहभागी झाले. महिलांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सांधिक प्रयत्नातून, या तीन दिवसात १०४२९ महिला गुंतवणूकदारांनी “महिला सम्मान बचत पत्र” खाती उघडली.
काय आहे हि “महिला सम्मान बचत पत्र” योजना ?
१. सदर योजनेसाठी महिला व मुलींसाठी उपलब्ध कोणतीही वयोमर्यादा नाही.
२. सदर योजना दोन वर्षासाठी असून व्याज ७.५% चक्रवाढ पद्धतीने मिळेल.
३. एका खात्यात किमान रुपये १,०००/- व कमाल रुपये २,००,०००/- गुंतवता येतील.
४. सदर योजनेत एका खात्यात एकच Deposit करता येणार असल्याने, दुसरे खाते, तीन महिन्याच्या अंतराने उघडता येईल. एका खातेदारास सर्व खाते मिळून कमाल रुपये २,००,०००/- गुंतवता येतील.
५. एक वर्ष झाल्यानंतर खात्यातून ४०% रक्कम एकदा काढता येईल.
६. अपवादात्मक परिस्थितीत मुदत पूर्व खाते बंद करण्याची सोय.
महिला सम्मान बचत पत्र” योजना हि केंद्र शासनाधित मान्यताप्राप्त, संपूर्ण सुरक्षित, उच्च व्याज दर असलेली विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे, या योजनेस पुणे शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या प्रचारासाठी, कर्मचारी वर्गाबरोबर विविध स्वयंसेवी व शैक्षणिक संस्था. महिला बचत गट, विभागीय आयुक्त कार्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्टर कुलकर्णी व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अभिजित इचकेप्रवर अधिक्षक डाकघर, पुणे शहर पूर्व विभाग,
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!