यामध्ये राज्यकर उपायुक्त प्रकाश सूर्यवंशी, दत्तात्रय कोरडे, अभिजीत धने, सहाय्यक राज्यकर आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, डॉ प्रिया देहेडकर, आस्थापना अधिकारी भगवंत चेचे, राज्यकर अधिकारी संतोष लठ्ठे, गणेश घुले, प्रशांत फलक, राज्यकर निरीक्षक संगीता क्षीरसागर, विजय पवार, अमोल मिडशीकर, अभिजीत ढोणे, उत्तम यादव, रमजान महाबरी, विकास पोटरे, अनंत कोरेगावकर, रोहित काटवटे, प्राजक्ता राणी, अमीन शेख, बानेश राऊत, नागोराव जाधव, सुहास कळबांडे, अमोल सरडे, श्रेयस पाटील, प्राजक्ता चंगेडिया व आदी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
वस्तू व सेवा कर दिन पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा ; उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे सन्मान…
वस्तू व सेवा कर दिन पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा ; उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे सन्मान…
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), १ जुलै रोजी वस्तू व सेवा कर दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने वस्तू व सेवा कर भवन, येरवडा, पुणे येथे ६ वा वस्तू व सेवा कर दिन धनंजय आखाडे अपर राज्यकर आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दिलीप दिक्षित, निवृत्त अपर विक्रीकर आयुक्त उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कर अनुपालन करणाऱ्या करदात्यांना तसेच पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय कर, राज्य कर व आंतरराज्य कर या तीन करांऐवजी एकच कर असेल – दिलीप दीक्षित…
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीप दिक्षित यांनी मुंबई विक्रीकर कायदा ते वस्तू व सेवा कर कायद्यापर्यंतचा प्रवास अत्यंत ओघवत्या शैलीत उपस्थितांसमोर मांडला. तसेच भारताला केवळ एकाच कराची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यासाठी भविष्यात केंद्रीय कर, राज्य कर व आंतरराज्य कर या तीन करांऐवजी एकच कर असेल असा आशावाद व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्र राज्याच्या महसुलातील चांगल्या कामगिरीकडे अपर राज्यकर आयुक्त, धनंजय आखाडे यांनी लक्ष वेधले आणि पुणे क्षेत्राच्या राज्यकरातील वाढत्या महसुली जमेवर देखील भाष्य केले. करदाते आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास पुणे क्षेत्राचे सर्व राज्यकर सहआयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल समाने, सहायक राज्यकर आयुक्त व चंद्रशेखर बोर्डे, सहायक राज्यकर आयुक्त यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला वस्तू व सेवा कर भवन येथे अतिशय मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
येत्या ३ जुलै ला रक्तदान शिबीराचे आयोजन…
त्याचबरोबर येत्या ३ जुलै २०२३ रोजी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तू व सेवा कर भवन, येरवडा, पुणे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...
टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअॅक्टिव्ह अॅकॅडमीच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...
शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...