Homeमहाराष्ट्रशिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेत 100 टक्के निकालाची नोंद केली आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल 15 एप्रिल रोजी जाहीर झाला.

शाळेच्या या यशात कु. आंधळे अथर्व राजू याने 95.60 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. शेलकर स्वरा सतीश हिने 95.40 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. इघे कीर्ती संतोष हिने 95 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय कु. पुरणपोळे अदिती संजय (94.80%) आणि कु. दाभाडे शिवम विलास (94.60%) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.

या बॅचमध्ये एकूण 116 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुणांसह विशेष प्राविण्य संपादन केले. बीड जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेने ठसा उमटवला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, आमदार विजयसिंह पंडित, शारदा क्रीडा अकादमीचे संचालक रणवीर पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. विशाल भारद्वाज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच माजी प्राचार्य संतोष कुमार अन्नम यांनाही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!