Homeताज्या बातम्यामहाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भीमराज सेनेच्या म्हणण्यानुसार, महाड शहर पोलीस निरीक्षक, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे यापूर्वी अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागांत मटका व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ थाटे, कार्याध्यक्ष आनंदभाऊ सूर्यवंशी, सिद्धार्थ सुरडकर, कोकण प्रदेश सचिव लवेश साळवी आणि रायगड जिल्हा सचिव आदित्य मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सुकट गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नातेखिंड आणि वीरेश्वर मंदिर परिसरात अवैध मटका व्यवसाय सुरू असल्याचे सांगत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. अवैध धंद्यांमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

यावेळी कोकण प्रदेश सचिव लवेश साळवी यांनी अवैध मटका व्यवसायासंदर्भात आणखी काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला. आवश्यकतेनुसार हे पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

“जे अवैध धंदे नागरिकांना दिसतात, ते प्रशासनाला का दिसत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भीमराज सेनेने दिला. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!