Homeमहाराष्ट्रशेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. या संदर्भात स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले असून, राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत कुटुंबातील सहधारक किंवा वारसांमध्ये होणाऱ्या जमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी शुल्क माफीची तरतूद यापूर्वीपासून अस्तित्वात होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही सवलत केवळ तहसीलदारांच्या आदेशानंतर नोंदणीस आलेल्या कागदपत्रांनाच लागू केली जात होती. त्यामुळे सहधारकांनी परस्पर सहमतीने थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेल्या वाटणीपत्रांवर नोंदणी शुल्क आकारले जात होते, ज्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक अडथळे निर्माण होत होते.

या पार्श्वभूमीवर शासनाने नव्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे की, वडिलोपार्जित शेतजमिनीवर वारसांना हक्क प्राप्त झाल्यानंतर सहधारकांनी केलेले कोणतेही वाटणीपत्र—ते कलम ८५ अंतर्गत असो किंवा थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेले असो—त्यावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, जमीन वाटणीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी नोंदणी शुल्काच्या कारणामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाटणी प्रक्रिया लांबणीवर पडत होती तसेच वाद निर्माण होत होते. आता हा आर्थिक अडसर दूर झाल्याने वारसांमध्ये परस्पर सहमतीने जमीन वाटप करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अवर सचिव विनायक लवटे यांनी राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, संबंधित यंत्रणांनी याबाबत दक्ष राहून निर्णय प्रभावीपणे राबवावा, असेही सांगितले आहे.
शासनाचा हा निर्णय शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आर्थिक भार कमी करून जमीन वाटणी प्रक्रियेला गती देणारा ठरेल. यामुळे कुटुंबातील वाद कमी होऊन पारदर्शक व सुलभ व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!