Homeमहाराष्ट्रशाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील देलनवाडी येथे घडली. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी ‘ब’ चा विद्यार्थी कुमार ईशान सत्यपाल आत्राम याचा दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच, सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळला. पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ईशान हा केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही तितकाच हुशार होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे तो शिक्षक आणि वर्गमित्रांचा अत्यंत लाडका होता. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने शाळेतील शिक्षकांना अश्रू अनावर झाले आहेत. ईशानच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या, २१ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या बातमीने पालकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका उमलत्या कळीचा असा आकस्मिक अंत झाल्याने देलनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ईशानच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार असून, संपूर्ण ब्रह्मपुरी शहर आत्राम कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

error: Content is protected !!