इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विश्वस्तपदी जावेद नजीर शेख यांची नियुक्ती…
पुणे : इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे येथील जावेद नजीर शेख यांची फाउंडेशनच्या विश्वस्त (Trustee) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 12 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहणार असल्याचे अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये मशीद, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, ग्रंथालय तसेच कम्युनिटी सेंटर यांचा समावेश असून, अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या या उपक्रमांसाठी जावेद शेख यांचे सार्वजनिक सेवेतले योगदान आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे नियुक्तीपत्र इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारूकी यांनी दिले आहे. यावेळी ट्रस्टी व आर्किटेक्ट इमरान शेख आणि ट्रस्टी अली इनामदार हे उपस्थित होते.
तसेच या सर्व प्रकल्पाचे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारूकी, ट्रस्टी व आर्किटेक्ट इमरान शेख यांचे आभार जावेद नजीर शेख यांनी मानले आहे.
“इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. समाजहितासाठी राबवण्यात येणाऱ्या फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न राहील. मला ही संधी दिल्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष जफर फारुखी साहेब तसेच आर्किटेक्ट इमरान शेख साहेब यांचे मी मनापासून विशेष आभार मानतो.”
– जावेद नजीर शेख






















