विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यातील गढी येथील जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांचा वाढदिवस कारखान्याच्या कार्यालयाच्या वतीने १२ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाच्या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी तसेच डेप्युटी चीफ इंजिनिअर ऋषिकेश देशमुख यांनी दत्तात्रय टेकाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. साखर उद्योगातील त्यांचे योगदान, कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सक्षमपणे पुढे जात असल्याबद्दल उपस्थितांनी गौरवपूर्ण शब्दांत कौतुक व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक गोविंद चव्हाण, स्टोअर कीपर राजेंद्र ढेंगळे, कामगार कल्याण अधिकारी सचिन उधे, ऊस पुरवठा अधिकारी वशिष्ठ कुठे, सिव्हिल इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी, ईडीपी मॅनेजर धनाजी भोसले, लेखापाल युवराज गायकवाड, डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर ज्ञानेश्वर आघाव, इलेक्ट्रिक इंजिनिअर नानासाहेब काकडे, डॉ. संभाजी पवार, वाहन विभाग प्रमुख विष्णु गायकवाड, कॅशियर तथा सरपंच अमर सोळुंके आणि ज्येष्ठ वरिष्ठ लिपिक उद्धव पारे यांच्यासह कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी दत्तात्रय टेकाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






















