Homeक्राईमनाशिक शिक्षण विभागात ‘शालार्थ’ घोटाळा; १५० कोटींची फसवणूक, तीन माजी उपसंचालकांसह ८४१...

नाशिक शिक्षण विभागात ‘शालार्थ’ घोटाळा; १५० कोटींची फसवणूक, तीन माजी उपसंचालकांसह ८४१ जणांवर गुन्हा

Times Of Maharashtra Desk  : नाशिक येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून शासनाची सुमारे १५० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन माजी शिक्षण उपसंचालकांसह एकूण ८४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे.

शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर विजयराव देवरे यांनी शासनाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन प्रभारी उपसंचालक नितीन बच्छाव, माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आणि डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह विविध जिल्ह्यांतील वेतन व भनिनी पथकाचे अधीक्षक, लेखाधिकारी तसेच ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार मार्च २०१९ ते जून २०२५ या कालावधीत हा घोटाळा घडला. अपात्र असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट वैयक्तिक मान्यता आदेश तयार करून त्यांना शालार्थ आयडी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांच्या अधिकृत लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ प्रणालीमध्ये अनधिकृत ‘ड्राफ्ट’ भरले गेले. या प्रक्रियेद्वारे कोणतीही अधिकृत पडताळणी न करता संबंधित कर्मचाऱ्यांची वेतन बिले मंजूर करण्यात आली.

यामुळे शासनाच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी काढण्यात आला असून सुमारे १५० कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे शासकीय आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३३८, ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६, ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास नाशिक शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!