Homeआरोग्यपाठ फिरवून उभे असलेले दोन जीव; शरीराने जवळ, पण मनाने दूर गेलेले...

पाठ फिरवून उभे असलेले दोन जीव; शरीराने जवळ, पण मनाने दूर गेलेले नाते.

रुपेश देशमुख (प्रतिनिधी-ब्रह्मपुरी) : आजच्या डिजिटल युगात आपण एका विचित्र विरोधाभासात जगत आहोत. फेसबुकवर ‘फॅमिली व्हॅकिशन’चे अल्बम पडतात, इन्स्टाग्रामवर ‘हॅपी ॲनिव्हर्सरी’चे रिल्स व्हायरल होतात आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर पती-पत्नीचे हसरे फोटो झळकतात. पण, या लखलखत्या स्क्रीनच्या मागे एक काळोखी शांतता पसरली आहे. बाहेरून ‘परफेक्ट’ दिसणारे हे संसार आतून मात्र ‘डिजिटल वाळवी ‘ने पोखरले जात आहेत. घराच्या बेडरूममध्ये दोन व्यक्ती शरीराने जवळ आहेत, पण मनाने हजारो मैल दूर असलेल्या आपल्या ‘व्हर्चुअल’ मित्रांशी किंवा अनोळखी फॉलोअर्सशी जोडलेल्या आहेत.

आभासी सुखाचा मुखवटा

सोशल मीडिया हे प्रदर्शनाचे माध्यम झाले आहे. आपण किती सुखी आहोत, हे जगाला ओरडून सांगण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर जोडीदाराशी गप्पा मारण्यापेक्षा ‘फूड फोटोग्राफी’ आणि ‘चेक-इन’ला महत्त्व दिले जाते. फोटोमध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हसणारे जोडपे फोटो पोस्ट केल्यावर पुन्हा आपापल्या मोबाईलमध्ये मान खाली घालून बसते. हा ‘मूक संवाद’ नात्यातली जवळीक संपवत चालला आहे. आपण जगाला दाखवण्यासाठी जगत आहोत की स्वतःच्या आनंदासाठी, हा प्रश्न आता कळीचा ठरत आहे.

बेडरूममधील तिसरा ‘वाटेकरी’

पूर्वी बेडरूम ही पती-पत्नीच्या खाजगी संवादाची, सुख-दुःखाची देवाणघेवाण करण्याची जागा होती. आज तिथे ‘मोबाईल’ नावाचा तिसरा
वाटेकरी शिरला आहे. रात्री झोपण्यापूर्वचि ते १०-१५ मिनिटांचे निवांत क्षण, ज्यात दिवसभराचा थकवा संवादाने दूर व्हायचा, ते आता ‘स्क्रोलिंग’ने गिळले आहेत. दोघेही एकमेकांकडे पाठ करून आपापल्या स्क्रीनमध्ये गुंग असतात. यालाच मानसशास्त्रात ‘फबिंग’ म्हणतात, म्हणजे समोरच्या व्यक्तीला डावलून फोनला महत्त्व देणे. हे फबिंग हळूहळू नात्यातली ओढ संपवून टाकतो.

तुलनेचा विषारी विळखा

सोशल मीडियावरील इतरांचे ‘फिल्टर्ड’ आयुष्य पाहून आपल्या जोडीदाराबद्दल असंतोष निर्माण होऊ लागला आहे. “त्याचा नवरा तिला फिरायला नेतो”, “त्यांची बायको किती फिट आहे”, अशा तुलना मनाला घर करून बसतात. समोरच्या व्यक्तीचे.
केवळ १० टक्के चांगले आयुष्य पाहून आपण आपल्या ९० टक्के चांगल्या नात्याला कमी लेख लागतो. यातूनच चिडचिड, टोमणे आणि विनाकारण वादाचे प्रसंग उद्भवतात.

अफेअर्स’ भावनिक गुंतवणूक आणि ‘डिजिटल

जेव्हा पती-पत्नीमधील प्रत्यक्ष संवाद कमी होतो, तेव्हा माणूस तो शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतो. फेसबुकवरील जुने मित्र किंवा इन्स्टाग्रामवरील अनोळखी व्यक्तींकडून मिळणारे ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट्स’ तात्पुरता आनंद देतात. यातूनच नकळत ‘इमोशनल इन्फिडेलिटी’ (भावनिक प्रतारणा) सुरू होते. जोडीदाराला न सांगता केलेले चॅटिंग किंवा गुपितं हळूहळू विश्वासाला तडे देतात.

संवादाचा ‘रिस्टार्ट’ कसा करावा ?

» डिजिटल फास्टिंगः रात्री ९ नंतर मोबाईल घराच्या एका कोपऱ्यात शांत करून ठेवा. तो वेळ फक्त एकमेकांसाठी द्या.

आय कॉन्टॅक्ट (डोळ्यांत बघून बोलणे): स्क्रीनऐवजी एकमेकांच्या डोळ्यांत बघून संवाद साधा. यामुळे नात्यातील विश्वासार्हता वाढते.

प्रदर्शनापेक्षा अनुभवावर भरः प्रत्येक गोष्ट स्टेटसवर ठेवण्याची गरज नाही. काही आठवणी फक्त तुमच्या दोघांच्याच राहू द्या

डिजिटल गॉसिप टाळाः इतरांच्या आयुष्याशी तुलना करणे थांबवा. तुमच्या जोडीदाराचे गुण मान्य करायला शिका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!