Homeताज्या बातम्यापुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश...

पुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश…

पुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश…

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून विविध संघटना, पक्ष शहरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल उत्पादन शुल्क विभागात जात आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम देत अनधिकृत पब, बार यावर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

विशाल अगरवाल यांना कोर्टात आणले असता संघटनेकडून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही घडला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. त्यानुसार पक्ष, संघटना आक्रमक झाल्याचेही दिसत आहे. पुणे शहरात नागरिकांच्या विविध प्रश्नांना घेऊन पक्ष, संघटना यांच्याकडून आंदोलने, उपोषण , निदर्शने सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.

पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ 

च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश २८ मे २०२४ ते १० जून २०२४ पर्यंत 

लागू आहे. याअंतर्गत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोवर नेणे, दगड अथवा शस्त्रे 

किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले.

तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५२ टक्के समाज, पण विखुरलेली शक्ती… निवडणुकीपुरती जात आणि नंतर संघर्षाची वाट!

0
Nilesh Thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज OBC समाजाने आत्मपरीक्षण करून हक्क, नेतृत्व आणि एकीचा मार्ग स्वीकारण्याची गरज. भारतातील इतर मागासवर्गीय (OBC) समाज हा देशातील...

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

error: Content is protected !!