Homeताज्या बातम्याध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा ; पुनील बालन यांच्याकडून...

ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा ; पुनील बालन यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन…

ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा ; पुनील बालन यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन…

‘कोल्हापूर टस्कर्स’च्या जर्सीचे उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण…
पुणे – ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चा (MPL) २ रा सीझन २ जूनपासून सुरू होत असून ‘एमपीएल’मध्ये सहभागी झालेल्या पुनीत बालन यांच्या ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या संघाच्या जर्सीचे संघ मालक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ‘‘‘एमपीएल’मध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मॅच ही अंतिम मॅच असल्याचे समजून खेळा,’’ अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यात जिद्द निर्माण केली.
 ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून राज्यात भव्य स्वरुपात ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चे (MPL) आयोजन करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील अनेक गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी मिळत आहे. यंदा ‘एमपीएल’चा दुसरा हंगाम सुरु होत असून यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांचा ‘कोल्हापूर टस्कर्स’ हा संघही अनुभवी खेळाडू केदार जाधव याच्या नेतृत्त्वाखाली या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या संघासाठीच्या जर्सीचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी संघमालक पुनीत बालन यांनी उपकर्णधार म्हणून श्रीकांत मुंडे याच्या नावाची घोषणा केली.
खेळाडूंना शुभेच्छा देताना ते म्हणाले, ‘‘या सीझनमधील प्रत्येक मॅच खेळताना ती अंतिमच आहे, असे समजून प्रत्येकाने खेळले पाहिजे. त्यासाठी शक्य असेल तितकी जास्त घ्या. मेहनत आणि एकाग्रता या बळावरच तुम्ही तुमचे उद्दीष्ट साध्य साधू शकाल’’.
यावेळी कर्णधार केदार जाधव म्हणाले, ‘‘यंदाच्या मॅचेससाठी आमची खूप चांगली तयारी झाली आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने चांगले कष्ट घेतले आहे. त्यामुळे यंदा आम्हीच जिंकू, असा आमचा आत्मविश्वास आहे. यासाठी प्रत्येक खेळाडूने कसून सराव केला आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र प्रिमीअर लीगमधील सर्वोत्तम संघ म्हणून आम्हीच असू’’.
‘‘कोल्हापूर टस्कर्स’ने गतवर्षीच्या हंगामात चांगली खेळी केली, परंतु अंतिम यश मात्र मिळू शकले नाही. यंदा आमच्या संघामध्ये सर्वच खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीतही आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतील, असे आहेत. त्यामुळे यंदा आमच्यासाठी यश दूर नाही.’’
पुनीत बालन
(संघ मालक व युवा उद्योजक)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!