दिनेश चाफळकर (रायगड प्रतिनिधी) : रोहा तालुका येथील चणेरा भागातील खारखर्डी पारनखार गावात मोटारसायकल वेगाने चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नींसह गावातील आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण मोटारसायकलवरून गावात सुसाट वेगाने येत होते. गावातील नागरिकांनी त्यांना गाडी हळू चालवण्याचा सल्ला दिला. मात्र या सूचनेचा राग मनात धरून संबंधित तरुणांनी वाद घालत अचानक धारदार चाकूने सपासप वार केल्याचे सांगितले जाते.
या अचानक झालेल्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह गावातील आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस स्टेशन चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्याआधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
परिसरात तणावाचे वातावरण
घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
रोहा तालुक्यात चाकू हल्ला; वेगाने गाडी चालवण्याच्या वादातून तिघे जखमी
RELATED ARTICLES
- Advertisment -
मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त...
गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...
वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...
एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...
जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे,...