रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पलटवार काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. “शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करूनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, भाजपने दिलेली आकडेवारी पूर्णपणे चुकीची आहे,” आकडेवारीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल थांबवण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.
भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेसने पुराव्यासह स्पष्ट केले. त्यातील मुख्य फरक ग्रीन जिम व क्रीडांगण दुरुस्ती फक्त ₹३ लाख, स्वच्छता व नाली सफाई ₹१ कोटी ५० लाख रुपये याप्रमाणे आहे. सत्ताधाऱ्यांनी सांगितले की, युवकांना क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी ग्रीन जिमसाठी भरघोस तरतूद केली आहे. तसेच, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून स्वच्छता कामांसाठी तरतूद दुप्पट ठेवण्यात आली आहे.
शहरातील मोकळ्या जागांच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी ७२ लाख रुपये प्राप्त झाले होते. मात्र, मागील प्रशासकीय काळात चुकीच्या जागांची निवड करून २७ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे सध्याची कामे थांबवून उर्वरित १ कोटी ४५ लाख रुपये योग्य जागी खर्च करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. याच कारणास्तव या वर्षाच्या ‘हेड’वर नवीन रक्कम दाखवण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या ‘झोन बदला’च्या बातम्यांवरही सत्ताधाऱ्यांनी कडक शब्दात भाष्य केले.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये ही प्रक्रिया केली जाते. अनेक शेतकरी आपली जमीन शेतीसाठी अयोग्य असल्याने ती रहिवासी झोनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करतात, त्यावरूनच हे ठराव घेतले जातात. या प्रक्रियेत कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसून, भ्रष्टाचाराचे सर्व आरोप निराधार आहेत. तसेच ‘गुंठेवारी’चा उल्लेखही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करू नये. अर्थसंकल्पात तरतूद कमी पडल्यास ‘पुरवणी अंदाजपत्रका’ची तरतूद असतेच. विकासाच्या कामात खोडा घालण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी. अशी प्रतिक्रिया सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केली.
यावेळी ब्रम्हपुरी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश मिसार, उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, नगरसेवक सचिन राऊत, मनोज कावळे, मोंटू उर्फ जगदीश पिलारे, सतीश हुमणे, प्रकाश खोब्रागडे, राकेश पडोळे, अनुकूल शेंडे, चंद्रकांत बावनकुळे, बबिता आमले, जयश्री कुथे, सपना बल्लारपुरे, काजल तलमले, रेणू ठेंगरे, हेमलता सिंहगडे, गीता मेश्राम, पुष्पलता पोपटे, ज्योती राऊत, रंजना बुराडे, स्वीकृत नगरसेवक पुष्पाकर बांगरे व वाकार खान प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच
RELATED ARTICLES
- Advertisment -
लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!
पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...
MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...
मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश ठाकरे) : चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...
कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...