Homeताज्या बातम्यापोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) : 
गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला आहे, पोमण यांनी हा पदभार स्विकारताच त्यांच्यावर अपेक्षांचा भार वाढला असुन सामान्य जनतेच्या त्यांच्याकडुन असलेल्या अपेक्षांची पुर्ती होईल का ? हा खरा प्रश्न आहे, नाहीतर पूर्वी प्रमाणच्या अधिकार्यांप्रमाणेच पोमण ही शोमँन ठरणार असा प्रश्न म्हसवडकरांना पडला आहे.

माण तालुक्यातील सर्वात मोठे व संवेदनशील पोलीस स्टेशन म्हणुन म्हसवड पोलीस स्टेशन ची ओळख आहे, सातारा व सोलापुर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या या शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत ८ बीट येत आहेत. तर ४२ छोट्या मोठ्या गावांचा समावेश आहे, या शिवाय ५१ पोलीस कर्मचारी या पोलीस स्टेशन अंतर्गत तैनात आहेत, अशावेळी या सर्वांचा मुख्य अधिकारी म्हणुन येथे एक स.पो.नि. पद कार्यरत आहे. या पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी सोनवणे यांची गत २ महिन्यांपुर्वी अचानक येथुन तडका – फडकी बदली करण्यात आली होती. तेव्हापासुन या पदासाठी अनेकांची नावे पुढे आली अनेक नावे चर्चेतही राहीली मात्र प्रत्यक्षात ती नावे चर्चेपुरतीच मर्यादीत राहिली, आणी शेवटी अचानक पुसेगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या संदीप पोमण यांची येथील पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ति करण्यात आली.

म्हसवड पोलीस स्टेशन ला संदीप पोमण यांनी हजर होत पदभार स्विकारताच त्यांना भेटण्यासाठी अनेकांची पोलीस स्टेशन ला अक्षरशा रिघ लागली आहे, ही रिघ सर्वसामान्यांची नाही तर राजकिय मंडळींची व दोन नंबर धंदे करणार्यांचीच जादा आहे, सामान्य जनतेला पोलीस स्टेशन ला अधिकारी कोण आहे, कोण येतयं आणी कोण जातयं याचं फारसं काही देणं घेणं नाही त्याची फक्त पोलीस स्टेशन ला गेल्यावर कोणीतरी त्यांची कैफियत ऐकुन घ्यावी एवढीचं माफक अपेक्षा आहे. त्याला खुर्चीत बसलेली व्यक्ती ही अधिकारी आहे की कर्मचारी आहे याचीही माहिती नसते, त्याला तिथे गेल्यावर जो त्याच्याशी प्रेमाने बोलतो, त्याचे गार्हाने ऐकुन घेतो तोच त्यांच्यासाठी अधिकारी असतो त्यालाच ती आपला देव मानते, ही सामान्य व्यक्तींची वस्तुस्थिती आहे, मात्र पोलीस स्टेशन हद्दीतील दोन नंबरवालेच आजकाल पोलीस स्टेशन मध्ये अधिकार्याच्या खुर्चीला खुर्ची लावुन बसत आहेत, जणु एकप्रकारे त्यांना अवैध व्यावसाय करण्याचा परवानाच मिळाल्याप्रमाणे त्यांचा सामाजिक आविर्भाव असतो, त्यामुळे सामान्य जनतेत अशा व्यक्तींची दहशत निर्माण होत आहे.

म्हसवड पोलीस स्टेशन खरे तर एकप्रकारे कुरण असल्याचे पोलीस दलातच बोलले जात असल्याने हे पोलीस स्टेशन आपल्याला मिळावे यासाठी अनेक अधिकार्यांचे येथे येण्यासाठी लॉबींग सुरु असते. पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय सुरु असुन त्यांना पोलीसांचाच आशीर्वाद लाभल्याने असे धंदे बोकाळले आहेत, तर असे धंदे करणारे बोके झाले आहेत. राज मान्यता मिळाल्याप्रमाणेच असे अवैध व्यवसाय येथे सुरु असल्याने म्हसवड नगरी अंधेर नगरी बनत चालली आहे, याला पोलीस प्रशासन च मुख्य जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

पोलीसांची दहशत ही फक्त सामान्य जनतेवरच होत असल्याने सामान्य जनतेला पोलीसांचेच भय अधिक वाटत आहे, तर अवैध व्यवसाय करणारे मात्र याच पोलीसांच्या पाठबळामुळे सामान्य जनतेवर दबाव निर्माण करीत आहेत, यापुर्वीच्या येथील अधिकार्यांनी काम कमी आणी प्रसिध्दीचीच हमी याप्रमाणे फक्त चमकोगिरी करुन प्रसिद्धीच्या झोतात स्वत:ला कसे रोज कसे ठेवता येईल यावरच अधिक लक्ष केंद्रीत केल्याने पोलीस स्टेशन चे भय फक्त सामान्यांपुरते उरले आहे.

नन्याने येथे रुजु झालेले पोमण हे खरे तर काहीसे रांगडे असल्याची माहिती समोर येत असुन त्यांनी पोलीस स्टेशन ची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी खुप काम करावे लागणार तर आहेच, या शिवाय शहरात सुरु असलेली डांगडींग, टवाळखोरांवर पोलीसी खाक्याची दहशत निर्माण करावी लागणार आहे. शहरात डी.जे च्या राजरोसपणे सुरु असलेला दणदणात, त्यावर तरुणाईचा बेधुंदपणे सुरु असलेल्या थयथयाटावर निर्बंध आणणे ही काळाची गरज बनली असुन स.पो.नि. पोमण त्याचा चोख बंदोबस्त करतील अशी अपेक्षा सामान्य वर्गातुन व्यक्त होत आहे. यापुर्वी प्रत्येक अधिकार्याने येथे काम करताना स्वत:ला सिंघम म्हणुन घेण्यात धन्यता मानली असली तरी त्यांची सिंघमगिरी ही फक्त कागदावरच राहिली आहे,

राजकिय नेत्यांचे लांगुणचालन करणे, अवैध व्यवसाय वाल्यांसाठी पायघड्या टाकणे यातच त्यांनी धन्यता मानली असल्याने पोलीस दलाची प्रतिमा काहीशी डागाळली आहे, तीच प्रतिमा उंचावण्यासाठी आता स.पो. नि. पोमण यांनी झाडाझडती करुन सदरक्षणाय, खलनिग्रणाय हे ब्रीद सर्वांना काय आहे. हे दाखवुन द्यायची वेळ आली आहे. नाहीतर पोमण हे अधिकारी सुध्दा शोमँन ठरले असे सामान्य जनतेने म्हणु नये एवढीच माफक अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!